Friday, March 03, 2006

मनातल्य! मनात

मनातल्या मनात........

आपल मन हे एक सगळ्यात complex पण efficient फ़िल्टर आहे नाही..?
चारचौघात वावरतांना बरोबर हव्या त्या (रूढ समाजसंकेतांना धरून) गोष्टी , हवे तेच विचार, मनातून जिभेवर येतात..... लोकांशी बोलतांना मी हा फ़िल्टर सतत "on" ठेवतो.. आणि बोचणारे, टोचणारे, असे विचार मनातच दाबून टाकतो..
मनाच्या backstage ला खूप गर्दी असते हो... पण आयत्या वेळी बरोबर हवा तोच विचारी कलावंत ठरलेली एन्ट्री घेतो..आणि पाठ केलेले dialogues म्हणून प्रसंग मारून नेतो.
आजपर्यंत असाच फ़िल्टर लावून जगलोय.. पुढेही जगेन बहुतेक असाच... पण मग फ़िल्टर करून मागे मनात उरलेल्या विचारांच काय? असे कितीतरी बंडखोर विचार, कल्पना, मनातल्या मनात रेंगाळत राहतात.. उगीचच पुन्हा पुन्हा मनाच्या भिंतींवर धडक देतात... ओरडून सांगतात.." आम्हालाही बाहेर काढा की राजे...!!"
तर, आजपर्यंत कडीकुलुपात डांबलेल्या या कैद्यांना आता मी बाहेर आणतोय..
तसा आजवर कधी काही लिहिण्याचा प्रयत्न केला नाही... आता करून बघावा म्हणतो..
बघू जमतय का...!!

य३

3 Comments:

Blogger Sumedha said...

वा! मनाच्या filter बद्दल अगदी नेमकं बोललास! मनातले विचार बाहेर काढायला हे खूपच प्रभावी व्यासपीठ आहे!

मराठी ब्लॉगविश्वात स्वागत, शुभेच्छा! असंच मनमोकळेपणाने लिहीत रहा. मनमोकळेपणाने प्रतिकिया मिळतील :-)

12:14 AM  
Blogger Y3 said...

ध्न्यवाद सुमेधाजी,
सुरुवात केलीये,, बघू कस आणि किती जमतय....

यतीन

10:26 AM  
Blogger Nina said...

my feelings exactly. khup chan mhantlayas- cudnt have put it better myself. Mi pan hech FILTER vaprun SURVIVE karu shakte :)

8:47 AM  

Post a Comment

<< Home