Sunday, March 19, 2006

"अहो.. आरम्भशूर:


मी ब्लोग लिहायला सुरुवात केलिये हि बाब 'बातमी' या सदरात येते हे मला माहितच नव्हतं. तशी ही 'बातमी' मी जमेल तितकी माझ्या मित्रांपासून आणि एकूणच आमच्या गावातल्या गावकर्यापासून गुप्तच ठेवली होती...
मी गेले तब्बल ३-४ आठवडे गुप्तपणे ब्लोग लिहितो आहे.. आता तुम्ही सगळे 'मराठीब्लो्गनेट' वासी आपलेच आहात हो.. तुमच्याशी आमचा गुप्ततेचा अलिखित करार आहेच...
पण ही बातमी गुप्त ठेवायला एक कारण आहे.. -
त्याच काय आहे की, ब्लोग लिहिण ही तशी 'माह्या' सहित्यिक गिरी ची सुरुवात असली तरी मी फ़ार महत्वाकांक्शी आहे बर.... भविष्यात माझ्या हातून (माफ़ करा.. माझ्या सूपीक डोक्यातून... ) श्रेष्ठ, प्रसिद्ध आणि चिरंतन अस काहितरी साहित्य प्रस्रुत होणार आहे ह्याबद्द्ल मला तीळ्मात्रही शंका नाही. मागील बर्याच वर्षांचा कालावधी मी रसायनशास्त्रातील गहन प्रश्नांची ऊकल करण्यात व्यर्थ दवडला असला तरी परवाच माझ्या एका जीव:श्च कंठ:श्च शास्त्रद्न्य मित्राने "माझ्या व्यक्तीमत्वाचा अभ्यास करता माझ्या मेंदूतील शास्त्रीय कोडी सोडवणार्या भागापेक्शा कलागुणांच डीपार्टमेंट जास्त 'चालू' (active अशा अर्थाने बर का) आहे " अस सूतोवाच केलं.
म्हणूनच मी मानव जातीच्या कल्याणास्तव लेखन कराव, साहित्यात भरीव कामगिरी करावी... म्हणजे प्रथम (सू)प्रसिद्ध मासिकात 'पिझ्झा बर्गर संस्क्रुतीचा महिला मुक्ती आंदोलनावरील अनुकूल प्रभाव' या विषयावर शास्त्रशुद्ध लिखाण (ही कल्पना अलिकडेच दुसर्या लेखात वाचली, ती लगेच 'चोरून' त्यावर मी तद्न्य बुद्धीने श्रेष्ट लिखाण कराव), मग एका दिवाळी अंकात नव कविता, किंवा दुसर्याचा लेख स्वत:च्या नावावर छापणं, मग पाच सहा रहस्यमय इंग्रजी कांदंबर्यांच भाषांतर करून 'स्व'नामे प्रसिद्ध करणे, मग भूताखेताच्या विनोदी कथा असलेले दोन तीन संग्रह (ह्या कथा नंतर रामसेंना विकून पैसा कमवता येइल ही दूऽरद्रुष्टी), त्यानंतर जमल तर एखाद वैचारीक पुस्तक वगैर लिहावीत असा सुद्न्य विचार मी केला....

व्यक्तीत: मला स्वत:ला प्रसिद्ध लेखक वगैरे होण्याची फ़ारशी इच्छा नसली तरी न जाणो मनात आलेल इथे खरडता खरडता पुढे मी समाज प्रभोधनकारी लेखन करेनही बहुतेक.. बहुतेक म्हण्जे काय करेनच.
पण हे सगळ गुप्त पणे करायच, कारण 'अस महत्कार्य माझ्या हातून व्हायच असेल तर माझ लिखाण मी समीक्शकांपासून लपवून ठेवाव' असा सल्ला मला माझ्या त्याच जीव:श्च कंठ:श्च मित्राने दिला. (कारण समीक्शक लोकांच्या पुढे काहि माझ चोरलेल लिखाण खपणार नाहि , हे सत्य तो वदावयास विसरला बहुतेक... तो बोलला असता तरी मी सोयिस्करपणे तिकडे 'काना'डोळा केला असता ..)
तर जमेल तितक्या गुप्तपणे होइल तेवढे लिखाण करून मग मला जेव्हा कोणता तरी पुरस्कार मिळेल तेव्हा कळेलच ना सगळ्यांना...

पण कशी कोण जाणे, बातमी फ़ुटली.. माझी तब्बल तीन चार आठवड्यांची प्रदीर्घ आणि दैदीप्यमान कारकीर्दीची स्वप्नं क्शणभंगूर ठरली.
माझ्या ईंटरनेटवरील अनूदिनीचा वास लागताच माझे समीक्शक मित्र इंटरनेट वर तासं तास मी केव्हा काहितरी लिहितो आणि कधी ते माझ्या लिखाणाची चिर्फ़ाड करतात याची वाट बघू लागले... काहिंनी माझ्या ब्लोग ला वारंवार भेटी देऊन मी काही लिहिल नसतांनाही "माझ्या कवितांतील कल्पनांचा आशय फ़ाऽऽऽर गहन आहे, माझी लेखन शैली कशी ओघवती आहे" यावर भाष्य पण केलं. म्हण्जे काय - तुम लिखो, हम उसके चिथडे कर के फ़डशा पाडने के लिये ऊतावीळ है..!
मी हा छुपा संदेश लक्शात घेऊनच मागचे २-३ आठवडे माझ्या प्रतिभेला दावणीला बांधून ठेवून , न लिहिता काढले.
पण मग माझे काहि समीक्शक मित्र वैचारीक उपवासाला बसल्याचीही बातमी माझ्या कानावर आली... त्यांचा हा उपवास हा 'मी काहितरी लिखाण कराव ' ही त्यांची मागणी मान्य होण्यासाठीचा भुक हडताल होता अशी मखलाशी त्यांनी केली असली तरी तो उपवास म्हणजे 'मेजवानीपूर्वीच लंघन' आहे हे ओळखण्या इतका मी चतुर आहे....
तो गड सर होत नाही अस बघून मग त्यांच्यातल्या काहिंनी माझ्या ब्लोग वर "अहो.. आरम्भशूर:' अशा संस्क्रुतोद्भव मायन्याचे मजकूर लिहून मला लेखनास उद्युक्त करण्याचा प्रयत्न करून पाहिला..

तरी मी बधलेलो नाहिये हे पाहून काहिंनी कोथरूड डेपो ते डेक्कन असे पौड आणि कर्वे रस्त्यावर निषेधात्मक मोर्चे पण काढल्याच संध्यानंद मध्ये परवा छापल होत म्हणे... ही ऐकीव माहिती आहे, कारण सध्या मी अमेरिकेच्या फ़ारीन मध्ये 'हालिवूड्च्या चित्रपटांतील कल्पना माझ्या कादंबरीत 'घुसवण्या' योग्य आहेत की नाही' याचा अभ्यास करत असल्याने तसा भारतातील महत्वाच्या घडामोडींपासून दूर आहे.
पण आता मात्र लै हाइट झाली... या मोर्च्यांमुळे मात्र मला खूप राग आला आहे... माझ्यासारख्या भावी साहित्यसम्राटाची चालवलेली अशी बदनामी...?
आता बघा मी काय करतो...
काय करणार हो..! फ़ार तर इकडून एक तिकडून दोन नवकल्पना चोरून "मम" म्हणुन लिहिणार...
असो....
माझ्या समीक्शक मित्रांनो,.. हि तुम्हास शरणचिठ्ठी....

तुमचाच
य३
भावी साहित्यसम्राट,
साहित्यसंमेलनाध्यक्श, ई. स. .......(साल तुम्ही भरून घ्या... तसा मी फ़ार बीजी हाय, पन तुमच्यासाठी वेळ काढेन ना..!)

Monday, March 13, 2006

लव्ह लेटर by संदीप खरे

----- संदीप खरें

आजच "नामंजूर" ऐकलं.
संदीपची प्रत्येक कवीता , किती जवळची, आपलिशी वाटते.. चाली पण काय छान लावतो तो प्रत्येक रचनेला....ऐकता ऐकता पायाबरोबर मन पण ठेका धरतं...

Saturday, March 11, 2006

वसंतराव आले वाटतं...



आज सकाळीच माझ्या गाडीतल्या सी डी प्लेयर ने वसंत त्रूतूच्या आगमनाची घोषणा केली...
लवकर शाळेत जायचं म्हणून थंडीत चरफड्त उठ्लो होतो. तशी अजून आमच्या गावात बर्यापेकी थंडी आहे... अगदी बर्फ पडत नसला तरी सकाळी बाहेर पडलं की कुड्कूडायला होतं.... हिवाळा हा त्रुतू माझ्यापेक्शाही माझ्या म्हातारीला अप्रिय आहे...म्हातारी म्हणजे माझी कार बरं का...! जरा कूठे हवा बदलली की हिला पडसं होतं आणि सी डी प्लेअर चा घसा गोठतो.

तर आज, मह्त्प्रयासाने पांघरूणातून बाहेर पडून , तयार हो उन गाडीत बसलो मात्र.... सी डी प्लेअर घसा खरवडून ठऽणाऽणा करायला लागला एकदम.... म्हटलं वा:.... हवामान खातं काय वाट्टेल ते म्हणू देत, आमचा वसंत तर सुरू झाला.... आशाजींची सी डी लावली.... तशी माझी म्हातारी पण जरा फ़ुरफ़ुरली... चारी चाक ऊधळीत गावातल्या रस्त्यांना साद घालत धावायला लागली..

"फुलले रे मन माऽऽझे...फुललेऽ रे...."

Friday, March 03, 2006

एक कप कॊफ़ीचा


मागे केव्हातरि houston, texas ला गेलो होतो... तेव्हा घेतलेले हे छायाचित्र....
आम्हि ४ मित्र नासा जवळ एका जागी brakefast ला गेलो असतान्नाचे...

इथे अमेरिकेत असलेल्या देसी लोकान्च कोफ़ीच्या रन्गाशी कालानुरुप सख्य होत जात. भारतातून प्रथम आल्यावर आपण पीत असलेली गोरी पान कॊफ़ी हळू ह्ळू , कले कलेने काळी होत जाते....
थोड्क्यात सन्गायच तर....
Color of your Coffee is directly proportional to your stay (No. of yrs) in US.
ह्या चित्रातील कॊफ़ीबाजान्चि नावे आणि अमेरीकेतिल वास्तव्य याप्रमाणे....
पराग : ५ वर्शे
जयदीप : ३ वर्शे
यतीन / य३ (अस्मादीक) : २ वर्शे
सन्जू: १ वर्श

आपल्याकडे चहात असा रन्ग्भेद असतो का ही मला एक उत्सुकता आहे.... कोणी सन्गू शकेल काय ?

मनातल्य! मनात

मनातल्या मनात........

आपल मन हे एक सगळ्यात complex पण efficient फ़िल्टर आहे नाही..?
चारचौघात वावरतांना बरोबर हव्या त्या (रूढ समाजसंकेतांना धरून) गोष्टी , हवे तेच विचार, मनातून जिभेवर येतात..... लोकांशी बोलतांना मी हा फ़िल्टर सतत "on" ठेवतो.. आणि बोचणारे, टोचणारे, असे विचार मनातच दाबून टाकतो..
मनाच्या backstage ला खूप गर्दी असते हो... पण आयत्या वेळी बरोबर हवा तोच विचारी कलावंत ठरलेली एन्ट्री घेतो..आणि पाठ केलेले dialogues म्हणून प्रसंग मारून नेतो.
आजपर्यंत असाच फ़िल्टर लावून जगलोय.. पुढेही जगेन बहुतेक असाच... पण मग फ़िल्टर करून मागे मनात उरलेल्या विचारांच काय? असे कितीतरी बंडखोर विचार, कल्पना, मनातल्या मनात रेंगाळत राहतात.. उगीचच पुन्हा पुन्हा मनाच्या भिंतींवर धडक देतात... ओरडून सांगतात.." आम्हालाही बाहेर काढा की राजे...!!"
तर, आजपर्यंत कडीकुलुपात डांबलेल्या या कैद्यांना आता मी बाहेर आणतोय..
तसा आजवर कधी काही लिहिण्याचा प्रयत्न केला नाही... आता करून बघावा म्हणतो..
बघू जमतय का...!!

य३